साडे तिन मुहूर्तापैकी एक मुहुर्त- गुढीपाडवा! चैत्र महिना गुढीपाडवा, लग्नसराई, खरेदी ,चैत्रातील हळदी- कुंकू ह्या सर्वां मध्ये पटकन निघून जातो.
चैत्रातील खरी मजा असते ती निसर्गाची. पिंपळाला फ़ुटणारी तांबुस लाल कोवळी पालवी …कोकिळेची कुहू कुहू …आणि इतर पक्षांची लगबग. पण आपल्याला एवढा वेळच कुठे असतो ?
आमच्या घराच्या समोर पिंपळाच्या झाडावर किती तरी नविन पक्षी येतात.
पिंपळाच्या फांद्यावर छानशी छोटी फळ येतात , त्यासाठी तर हे सुन्दर पक्षी येत नसावे ?
कोकिळेची साद जेवढि मोहवते , तितकीच मोहक वैशाखातील मोहक लैबर्नम वाटते. पिवळाधम्म रंगांवरुन नजर हटत नाही! हा खरा तर गुलमोहराचा साथी …
छायाचित्र सौजन्य : विजय