मोरपिस

morpisमाझ्या जाण्या येण्याच्या वाटेत काही फेरीवाले बसतात. तेव्हा काही घेतले नाही तरी , सर्व वस्तुं वर नज़र सहजपणे जाते. केळीवाला , भाजीवाले , छोट्या मुलांचे कपडे वगैरे बरेच काही . घरापासून जवळ शाळापण आहे. त्यामुळ मुलांची घरी जाण्याची गंमत मस्त अनुभवायला मिळते. कुणी मित्राशी खेळत असतात , मैत्रिणीच्या गप्पा रंगलेल्या असतात, कुणी मोठाले कार्ड बोर्ड संभाळत नेत असतात. काही आई कड़े दफ्तर देवुन निमूटपणे आज्ञा कारक मुलासारखे चालत असतात . काही साइकिल भरधाव सोडतात , तर काहीची नजर बोरे,पेरू वर असते.

आज ह्या गर्दित एका मोरपिसवाल्याची भर होती. दोन मिनिटे थबकलेच. लहानपणी आम्ही पण पुस्तकात मोरपिस ठेवत होतो. मनाशी हसू आले. मोरपिस जवळ असले की परीक्षेत छान गुण मिळतात क़िवा देव लवकर प्रशन्न होतो , असे काही तरी भावना असावी, नक्की आठवत नाही . पण बहुतेकांकडिल पुस्तकातुन मोरपिस हमखास डोकवायचे.

पण आजकल कोण ठेवत असतील , हा उगाचच आला , कोण घेणार ह्याच्या कडून मोरपिस .मी भाजी खरेदी करून परत फिरले .पण आज बऱ्याच जणांच्या हातात एक नविन वस्तू  होती , मोरपिस !!!

नजर परत मोरपिसवाल्या जवळ गेली . त्याचा हात रिकामी होता . मोरपिस आजही मुलांच्या मनात आहेतच . मने तीच होती . लहानपण तसेच आहे. बहुतेक मीच बदलले , मोरपिस म्हणजे बालिश कल्पना अशी माझी आताची समजूत. वाटले आपण मोठे का होतो ? नाही तर आज पण मी नक्की मोरपिसासाठी हट्ट धरला असता आई जवळ. आणि त्या चिमुकल्या रंगांच्या उधळणी मध्ये मस्त पैकी हरवले असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *