कर्जत हे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. परंतु पहिल्या दिवशी उन्हाच्या झळा जाणवल्या, रात्री हि तसेच वातावरण होते. पहाटे – पहाटे मात्र थोडा थंडावा जाणवला त्यामुळे दुसऱ्या दिवसाची सुरुवात उत्साहाने झाली. प्रथम नजर गेली ती मागच्या बाजूला असलेल्या सी- सॅा , त्राम्पोलीन, मेरी-गो-राउंड या क्रीडा साहित्याकडे. मेरी गो राउंड वर थोडे बालपण अनुभवले अन कुणी पाहात नाही ह्याची खात्री करून त्राम्पोलीन वर मनसोक्त उड्या मारून घेतल्या. सी सॅा वर बसण्यासाठी अनुराधाला राजी केले. मधेच स्वयंपाकघरात नजर टाकली. नाश्त्याला १५-३० मिनिटे लागतील हा अंदाज येताच साधारण ३० पावलावर असलेल्या छोटेखानी धरणाकडे मोर्चा वळवला. वनदेवता रिसोर्ट हे एकात्मता शेतीचे उत्तम उदाहरण आहे. काल आम्ही गायींचा मुक्तसंचार पाहिला. आत्ता ह्या छोटेखानी धरणावर मोठाले मासे उसळ्या मारत होते . हे तिथेच असलेल्या शेततळयातील बासा किंवा जिताडा माशां पैकी एक होते.

आज निसर्ग चित्रणासाठी २ पर्याय होते. एक तर नदीलगत मंदिराजवळ काम करू शकत होतो किंवा, थोडेसे चालत जाऊन गुंफा ( माझ्या माहिती प्रमाणे कोंढाणा गुंफा )परिसरात काम करणे . माझ्याकडे जलरंगा सोबत अक्रेलिक रंगाचे सामान होते , त्यामुळे वजन जास्त होते. किती चालायचे माहित नव्हते , एवढे ओझे घेऊन १ तास चालणे मला जमले नसते. शिवाय मी शूज हि घातले नव्हते त्यामुळे त्रास होण्याचाच संभाव जास्त होत. निव्वळ ट्रेकिंगसाठी परत यावे असा सुज्ञ विचार करून मंदिरपरिसरात काम करावयास सुरुवात केली.
मी बसले होते त्या समोरील डोंगरामधून वरील बाजूस रेल्वेचा बोगदा होता. वरील फोटोत निट पाहिले तर एक पांढरी -निळी रेषा दिसते , तीच बोगद्यातून पुढे जाणारी रेल्वे आहे. अधून मधून धडधडत जाणाऱ्या रेल्वेचा आवाज , एक वेगळीच वातावरण निर्मिती करत होती.
अक्षय पै , त्याचे आॅईल कलर्स , व त्यांची तनहाई….. तर दुसरा भन्नाट काम करणारा चित्रवेडा वैभव असा नदीच्या पात्रात जाऊन बसला होता…तेही इतक्या कडक उन्हात !
अरे !!! सांगायचे रहिले…. वरच्या फोटोत मोजकेच चित्रकार दिसताहेत . अर्धी फौज गुंफ़ेच्या चित्रीकरणासाठी गेले होती . त्यातील पहिल्या फळीचे वीर श्रुती व वैभव अडीच तास डोंगराला गवसणी घालून आले , पण त्यांना गुंफा नाही सापडली … असो …होते असे कधीतरी…परंतू दुपारनंतर परतलेल्या दुसऱ्या फळीतील मोहरे पण नाउमेदीने परत आले. अर्थात सर्व जण जेवून परत उमेदीने नदी परिसर चित्रणात गुंतले.
Write up is Very Nice Manisha mam .
खुप खुप धन्यवाद साहेबरावजी !