फेसबुक च्या माध्यमातून अमोल सरांची जलरंगाची कार्यशाळा असल्याचे समजले. पण माझी गेल्या ६ महिन्यात बरीच भ्रमंती झाली असल्यामुळे जावे की नाही हे ठरत नव्हते.शिवाय फेब्रुवारी महिन्यातील केरळ ला अनुभवलेला उन्हाचा तडाखा आठवला , त्यामुळे मे महिन्यात अलीबाग मध्ये कसे वातावरण असेल असाही विचार आला. संस्कार भारतीच्या आउटडोअरला अमोल सरांचे निसर्गचित्रण पाहण्याचा योग बऱ्याच वेळा आला, परंतु इथे त्यांचे मार्गदर्शन पण मिळणार होते त्यामुळे जावे असे फार वाटत होते. त्याच दरम्यान माझे प्रबोधनकार ठाकरे , बोरीवली येथील चित्रांगना प्रदर्शनास भेट द्यायला अमोल सर आले, तेव्हा मात्र जाण्याचे निश्चित केले. विशेष आकर्षण होते ते मांडवा पर्यन्त बोटिने जाण्याचे। … मांडवा…अग्निपथ मधे संदर्भ आलेले गाव…
सकाळी ५ वाजताची अथर्वला डुयटी लावली, मला सिवुड्स स्टेशन पर्यन्त सोडण्याची. कारण रिक्शा मिळाली नाही तर निदान चालत जाता येईल अथर्व असला तर ..सिवुड्स स्टेशन पर्यन्त रिक्शा….मग ट्रैन ने सी.एस.टी .. टैक्सी ने गेट वे ऑफ़ इंडिया …..तिथून बोट ने मांडवा जेट्टी. बोट तिकीटात मांडवा जेट्टी ते अलीबाग पर्यन्त बस सेवा अंतर्भूत होती .आणि सर्वात शेवटी ३ सीटर रिक्शाने थेरोंडा येथील निवास स्थानी , असा साग्र संगीत प्रवास केला पण थकवा जाणवला नाही.
रिक्शातुन उतरताच,आमचे स्वागत थंडगार लिंबाच्या सरबताने झाले. नियोजित वेळेत पोहोचलो , त्यामुळे निवांतपणे नाश्ता करुन आजूबाजूचा परिसर पाहिला , स्केचेस केले, व जेवण्या साठी जमलो. दुपारी अमोल सरांचा डेमो झाल्यावर सर्वजण जलरंगात बुडून गेले. रात्रि सर्वांच्या चित्राचे प्रदर्शन व अवलोकन झाल्यावर चर्चासत्रात प्रत्येकाच्या चित्रात अमोल सरांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयोगी ठरले . इतरांसारख्या चुका माझ्या पण होत आल्यात, त्यामुळे अशा चुका कशा टाळाव्या ते कळले.
अतिशय रुचकर जेवण व नाश्ता , राहण्याची उत्तम सोय, हिरवागार परिसर, मनाला भुरळ पाडणारी नारळ -पोफळीची झाडे असे सगळे छान छान होते. निसर्गचित्रणा साठी निवडलेले स्पॉट हे , निवास स्थाना पासून फार तर ५-६ की.मी च्या अंतरावर असल्यामुळे प्रवासात वेळ वाय नाही गेला. मंदिरे , समुद्रकिनारा , कोळीवाड़ा ,कोकणातील घरे , किल्ला अशी स्पॉट मधील विविधता असल्यामुळे, काम करायला मजा आली. तीन दिवसाच्या कार्यशाळें ने मला भरपूर काही शिकवले। .. छोट्या जलरंगाच्या स्केचेसचे महत्व , पेन्सिल स्केचेसचे महत्व , स्पॉट कसा निवडावा इ.

माझा पहिलाच प्रयत्न असल्याने व संपूर्ण नियोजन मी एकटा पहात असल्याने खुपच धावपळ झाली.त्यांत कोणाची गैरसोय झाली असल्यास क्षमस्व ! —-अमोल सर
ह्यावर मि एवढेच म्हणू शकते की पहिल्या कार्यशाळेचे इतके सुयोग्य नियोजन केले तर पुढील कार्यशाळा नक्कीच त्याच्यापेक्षा यशस्वी होईल ! आम्ही सर्व शिबिरार्थी सरांचे शतश: आभारी आहोत
