पत्र …यो यो ला

प्रिय यो यो हनी सिंग, मला तुझ्या संगीतरचना खुप आवडल्या. वेड लावणाऱ्या रॅप रचना परत परत ऐकाव्या अशा आहेत. तु म्हणशील यात नविन ते काय? माझ्या कुठच्या पण कॉन्सर्ट ला ये! मग तुला कळेल माझी किती क्रेझ आहे ती? मान्य आहे. तुझं संगीत, रॅप मंत्रमुग्ध करणारे आहे. जबरदस्त वेदना आहे. तु ’रॉकस्टार’ पहिलास का? त्यात… Continue reading पत्र …यो यो ला

त्याचा मोबाईल

मोबाईल किणकिणला म्हणून तीने नजर वळवली, आणि तीला खुदकन हसु आले. ती मोबाईलची मागची बाजु कानाला लावणार होती. तीला त्याची आठवण झाली.   “शैलेंद्रला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणून, स्वत:चा मोबाईल हातात ठेवुन तो गर्रकन निघुन गेला होता. ती शैलेंद्र बरोबर बोलण्यात गर्क होती. परत समोर येऊन उभा राहीला, पण चेहऱ्यावर मिश्किल हसु होते. तीला… Continue reading त्याचा मोबाईल

जुने वर्ष………..

  खरेतर आपले नविन वर्ष पाडव्याला सुरु होते. पण आता सर्रास सगळेजण ३१ डिसेंबरलाच नविन वर्ष समजतात. अर्थात हे काहि नविन पिढिला उद्देशून नाही. आबालवृध्द सर्वांसाठी आता हा नविन सण झाला आहे. वर्षाच्या शेवटच्या क्षणाची हुर हुर काहि वेगळीच असते. सगळ्यांच्या वेगवेगळ्या आखण्या असतात. प्रत्येक जण वर्षभरापेक्षा काहि तरी वेगळे करण्याची धडपड करत असतात. ऑफ़िसच्या किंवा… Continue reading जुने वर्ष………..

घंटीवाला बातमीदार

म.टा. तील ’दखल’ ह्या विभागातील छोट्याश्या बातमीने चटकन लक्ष वेधले – ” घंटीवाल्याच्या बातम्या” जवळजवळ  समजु लागल्या पासुन पेपर, रेडिओ वरील बातम्या वडिलधारी मंडळी वाचताना आणि ऐकताना पाहत आलो.  मोठे होत असताना दुरदर्शनवरील बातम्या पाहण्यातील कौतुक अनुभवले. आता तर २४ तास बातम्यांचा भडिमार अनेक वाहीन्यांवरुन सतत होत असतो, तो हि अंगवळणी पडतो आहे. मोबाइल व… Continue reading घंटीवाला बातमीदार

त्याचा हट्ट

ति त्याला विसरण्याचा असफ़ल प्रयत्न करुन थकली. मनाला मुरड घालुन जगण्याची सवय तीने हट्टाने आपल्या मनाला घातली. पण अश्याच एका बेसावध क्षणी त्याचा फ़ोन पाहुन एकदम हरखुन गेली.नकळत चेहऱ्यावर प्रसन्न हसु उमटले. ज्या  क्षणासाठी आपण धडपडतो, तो क्षण समोर आल्यावर त्याला सामोरे जाण्याचे धैर्य होत नाही, मन तो क्षण अनुभवायला देखील कचरते, असे काहीसे झाले. काय… Continue reading त्याचा हट्ट

शिल्पा आणि मी

शिल्पा आणि मी, हे खास नाते आहे.  शिल्पा माझी मामेबहिण , दुसरी शिल्पा माझी मैत्रीण. एक बहिण पण खास मैत्रीण तर दुसरी मैत्रीण पण बहिणीसारखी. शिल्पा जेव्हा आमच्याकडे एक वर्ष कॉलेजसाठी होती, तेव्हा मला कळले कि मला बोलता येते, आणि आपण फ़क्त मोठ्याचे ऐकायचे नसते तर आपले मत पण व्यक्त करायचे असते.मी मितभाषी असले तरी… Continue reading शिल्पा आणि मी

तो …चांगला खडुस

दुपार नंतर ती थोडीशी मोकळी झाली कि महत्वाच्या कामांच्या सुचि वर नजर टाकत असे. ती कामे झरझर हातावेगळी झाली , कि मग पेमेंट साठी येणारे फोन , कुणाचा पगार द्यायचे राहिलेत, फोन बिले, विजेची बिले बाकि आहेत… कुठले  अधिकारी काय प्रश्न विचारतील ह्याचा अंदाज घेत होती. एवढ्यात तो तीरा सारखा केबिन मधे शिरताना विचारता झाला,” … Continue reading तो …चांगला खडुस

SMSगिरी

माझ्या एका वर्ग मैत्रिणीला sms करण्याचा छंद आहे. तिचा sms म्हणजे , एखादी छान शी कविता असते किःवा छोटासा उपदेश किःवा कधी कधी मैत्रिचा अर्थ कळतो नव्याने… मैत्रि एक वारा बेधुन्द वाहणारा मैत्रि एक पाउस वेडापिसा कोसऴणारा मैत्रि एक मन हळुवार जपणारे मैत्रि एक अतुट नाते हवे हवे से वाट्णारे मैत्रि एक अतुट नाते संपुन… Continue reading SMSगिरी

मनातील काही

मन.. मन कुणालाच कळत नाहीं….. क्षणात इथे तर क्षणात तिथे ….. आपल्या मनाचा थांग आपल्याला लागत नाहीं… तर इतर कुणाच्या मनातील काही कसे कळणार….. असो ….. मी काही कुणाच्या मनातील काही  नाहि सांगू शकत पण , काही आठवणी, काही  इतरांनी सांगीतलेलेप्रसंग सांगण्याचा प्रयत्न करते .बऱ्याच वेळा आपण जे काही बनतो त्यात या प्रसंगांचा आणि सर्व व्यक्तींचा… Continue reading मनातील काही