फेसबुक मधून भेटनाऱ्या मित्रपरिवरातील प्रिया पाटिल ह्या मैत्रिणींने दोन महिन्यांपूर्वी एका चित्रप्रदर्शना निमित्ताने फ़ोन वरुन सम्पर्क केला. काही वैयक्तिक कारणामुळे माझ्याकडून उत्तर नाही आले तरी त्यांनी परत मला प्रदर्शनात भाग घेण्यास प्रवृत्त केले. व्हाट्सअप ग्रुप मुळे कल्पना येत गेली की ३६ जणींचा सहभाग असणार आहे. फ़क्त मुंबईच्याच नव्हे तर इंदौर , नागपुर, पुणे येथील चित्रकर्त्या सहभागी होणार आहेत, मग उत्साह अजुन वाढला.
मि नेहमी प्रमाणे निसर्गचित्र न करता काही वेगळे करावे अशा विचाराने , माझ्या आवडीचा नृत्य हां विषय मांडण्याचे ठरवले. पहिले चित्र तैयार तयार झाले तेव्हा वाटले ५० % तयारी झाली , पण दूसरे चित्र काढ़ावयास घेतले आणि मग पहिले चित्र पसंत पडेना. नविन चित्र करावयास घेतले पण ते पूर्ण झाले नाही , असो एकंदर चित्रांगना-पूर्व तयारी करताना तर धमाल आली. माझे आवडीचे माध्यम एक्रेलिक मधे काम केले. प्रिया दिदींना माझी चित्रे खुप आवडली.
ग्रुप वरील सर्व जणींचा उत्साह विलक्षण होता , पहिल्या दिवसाचा ड्रेस कोड असावा अशी एक टुम निघाली , आणि त्यास सर्व चित्रांगनांनी भरभरून प्रतिसाद दिला.
नेहरु सेंटर आर्ट गॅलरीच्या असिस्टंट डायरेक्ट नीना रेगे, तसेच प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने व अमृता सुभाष ह्याच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. काही चित्रांगनांनी आपले मनोगत व्यक्त केले, ते ऐकताना प्रत्येकीचे उमलणे समजत गेले. “चित्रांगनां” च्या logo चा श्याम ह्यांनी सांगितलेला किस्सा बहरदार होता. प्रसिद्ध व्यक्तिमत्वे उपस्थित असूनही एकदम घरगुती वातावरणात सर्व कार्यक्रम पार पडला. रेगे मॅडम, सुकन्या मॅडम व अमृता मॅडम ह्या तिघींनी सर्व चित्रकर्तींचे भरभरून कौतुक केले, प्रत्येकी सोबत बऱ्याच गप्पा केल्या.
सेल्फीज , फोटोज , नविन मैत्रिणीं शी गप्पा ह्या सर्वांत वेळ कसा गेला ते कळलेच नाही! संध्याकाळी किशोर नान्दावडेकर सरांचा डेमो म्हणजे दुग्ध शर्करा योग होता.
प्रिया दिदींच्या ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल तर आम्ही सर्व त्यांच्या ऋणी आहोतच पण त्याही पेक्षा त्यांच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो. प्रिया दिदींचे आता आमच्या सर्वांच्या हृदयात स्थानापन्न झाल्यात. प्रिया दिदींच्या यजमानांचे तसेच कन्येची फार सुन्दर साथ “चित्रांगनां” करताना त्यांना लाभली , त्यांचेहि कौतुक करावे तेव्हडे थोडेच ! खुप खुप धन्यवाद प्रिया दिदी !!!!!
छायाचित्र सौजन्य : चित्रांगनां fb page
Manisha khup sundar. …….
धन्यवाद अस्मिता !!!
प्रदर्शन खूप सुंदर होते . सर्वांच्या मेहनितीने झालेले एक उत्कृष्ट प्रदर्शन . Mr पाटील आणि प्रिय पाटील यांच्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद . असेच उपक्रम करून नवीन दडलेल्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे . त्यामुळे आम्हाला एक चांगले चित्र प्रदर्शन पाहायला मिळाले
Well Done Priya ji…..Congratulations …..To All
छान उपक्रम!