दर बारा वर्षांनी येणारी सिंहास्त पर्व हि आपल्यासाठी एक पर्वणी असते. ह्या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला जायची
खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव जाणे झाले नाही. त्यामुळे जेव्हा नाशिक कलानिकेतन (चित्रकला महाविद्यालय ) च्या “पोर्टेट आणि रचना ” ह्या विषयावरील निवासी शिबीर होणार हे कळल्यावर मला आनंदच झाला. एकट्याने प्रवास तसेच अनोळख्या ठिकाणी जाणे हे माझ्यासाठी एक साहस होते. अर्थात स्वतःला कोषातून बाहेर काढण्यासाठी हे शिबीर करायचे असे मी ठरवले. प्रवासातील आणि नंतरचे चांगले – वाईट अनुभव बरेच काही शिकवून गेले, पण त्याबद्दल नंतर कधीतरी !सर्व प्रथम ह्या शिबिराबद्दल …. थोडे? नाही …खुप काही !!!
हे एकंदरीत आठ दिवसाचे निवासी शिबीर होते , त्यातील पहिले दोन दिवस अनिल नाईक सर, नंतर २ दोन दिवस रामचंद्र खरटमल सर व शेवटचे चार दिवस विलास टोणपे सरांचे मार्गदर्शन लाभणार होते . नाईक सरांनी सर्वप्रथम आम्हाला शपथ घ्यायला लावली “मी हे शिबीर माझा आत्मशोध घेण्यासाठी करत आहे आणि त्यासाठी एकाग्र , संयम व आत्मनिर्भर राहून प्रामाणिक प्रयत्न करेन. अर्थात त्यासाठी दिग्गज कलाकारांचा आदर्श ठेवू पण त्याची वाट मळकट करणार नाही.” आत्मशोध घेताना आजूबाजूच्या वातावरणात समरस होणे किती गरजेचे आहे आणि त्यातून चित्रा वर कसा प्रभाव दिसावा तसेच आजूबाजूच्या वातावरणातचे प्रतिबिंब चित्रात उमटणे हि प्रक्रिया कशी व्हावी – हि चर्चा तर फार रंगली. अर्थातच पहिल्या दिवशी आम्हाला त्यांनी आम्हाला ,आमची चित्रकलेची समज व ज्ञान पूर्ण कागदावर उतरवून स्वत: स पूर्ण रिते होण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांना आमच्याकडून नवीन कॅनव्हासवर नवीन सुरवात अपेक्षित होती. जुने ज्ञान व समजुती विसरून सर्वांनी भन्नाट कामे केली.

तिसऱ्या व चवथ्या दिवशी रामचंद्र खरटमल सरांनी “रचना” अर्थात composition ह्या विषया वर मोलाचे मार्गदर्शन केले. त्यासाठी चित्रकलेच्या प्रार्थमिक शास्त्राचा पाया मजबुत असणे हे किती महत्वाचे हे जाणवले. सरांनी दिलेल्या मुंगीच्या फक्त आवश्यक ते उचलण्याच्या गुणधर्माचा दाखला , कुठलीही कला शिकण्यासाठी कसा उपयोगी ठरतो हे नव्याने जाणवले. खरटमल सरांनी चर्चेल्या विविध प्रश्नांची उकल केली तरखरटमल सरांनी आम्हाला विचारलेले काही मार्मिक प्रश्न …जलरंग लहानपणापासून वापरत आलोत तरी ते कठीण का वाटतात ? दिग्गज कलावंताचे तैलरंग नेहमी ताजे का वाटतात ? रंग कसे बनतात ? चित्रकलेतील वर वर साधे वाटणारे प्रश्न किती महत्वाचे असतात नाही ? अर्थात ह्या सगळ्यां विविध प्रश्नांची उकल केली ज्या पद्धतीने सरांनी केली ते ऐकून कान धन्य झाले. इथे मात्र रचना हा विषय समजून , कागदावर उतरण्यासाठी दोन दिवसांचा वेळ अपूरा वाटला. सरांचे पुरस्कार प्राप्त तसेच इतर बरेच काम स्लाईड शो द्वारे पहावयास मिळाले.


नंतरचे ४ दिवस आम्हां सर्वांना विलास टोणपे सर ह्या उत्साही व्यक्तिमत्वाने भारून टाकले होते. टोणपे सरांची शिकवण्याची हातोटी अशी कि जसे काही आपण बाबा महाराज सातारकरांचे निरुपण ऐकतोय. आम्हांला समजेल अशा सोप्या भाषेत इतिहासं ,संगीत ,विज्ञान विशेषत: भौतिकशास्त्र व पुराणातील दाखले देत ते आमच्याशी संवाद साधत होते. ह्या सर्व विविधगोष्टी कलेशी इतक्या निगडीत आहे, हे पण एक अचंभित करणारे आश्चर्य होते आमच्यासाठी. सर्व क्लिष्ट गोष्टी इतक्या हलक्या फुलक्या झाल्या. शिवाय अजून एक गोष्ट स्पष्ट झाली कि google वर हवी तेवढी माहिती मिळेल पण “गुरुविण कोण दाखवी वाट?” हे हि एक तेव्हढेच मोठे सत्य आहे.



टोणपे सरांनी १० ते ५ या वेळेत तर भरपूर मार्गदर्शन केले पण त्यानंतर हि ८-९ वाजे पर्यंत पेस्टल माध्यम, पूर्ण फिगर ड्राइंग , ऍबस्ट्रक्ट व जलरंग ह्यां वर बहुमोल माहिती दिली. आम्ही पण सरांना बरेच प्रश्न विचारुन भंडावून सोडले. आणि त्यांनीहि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेवढ्याच उत्साहाने दिले. कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही पण त्यांनी प्रत्येक विद्याथ्यांच्या डब्यातून एक एक घास गोड मानून खाल्ला. एवढेच नांही तर घाटावर फेरफटका मारून नंतर सरांबरोबर घेतलेला चहा हा सुद्धा एक अविस्मरणीय अनुभव होता आमच्यासाठी . परदेशातील स्थित व्यक्ती इथे येऊन परदेशातील गमजा न मारता परत एकदा तुमच्या आमच्या सारखा होऊन जातो तेव्हा आपले हात नकळत जोडले जातात.



ह्या दहा दिवसात आम्हाला इतकी छान अनुभूती दिल्याबद्दल कुलकर्णी सर ,प्रिन्सिपल जनमाळी सर, अनिल अभंगे सर , साबळे सर, सूर्यवंशी सर या सर्वांना खुप खुप धन्यवाद! ह्या शिबीरात भेटलेल्या नविन मित्र – मैत्रिणींबद्दल आणि सर्व सुखद अनुभवांबद्दल परत लिहिणाराच आहे! तो पर्यंत Be Happy!!!!
Awesome ,,,,shbdach nhit,,,..,
धन्यवाद सतीशजी !
खरच खूप छान अनुभव आहे .special vilas sir रान बरोबर .I m attend demo ad lecturers in mumbai 28dec.
धन्यवाद!
धन्यवाद मॅम , आपल्या भावना मनापासून जगासमोर मांडल्या .खूप छान. ? ?
धन्यवाद साबळे सर !
you are not only good artist but also a good writer.
अप्रतिम लेखन मनिषा. खरंतर मला वाचनाची फार आवड नाही मात्र शब्दवर्णन वाचताना कधी तल्लीन झालो कळलंच नाही. मज्जा आली.
मन:पूर्वक धन्यवाद विक्रांत !!!
Mam …..kharach apratim ase varnan kele tumhi… kalesathi jivan he sutra lagu hote tumhala…