त्याचा मिस कॉल …..ती किती तरी वेळ तो नंबर कौतुकाने पाहत राहिली …. आज कशी आठवण झाली याला … स्वतः ला सावरत तिने त्याला फ़ोन लावला …त्याने खुप मोकळेणाने सांगितले. तुझे तिळगुळ आठवले म्हणून फ़ोन केला , ये न एकदा सगळ्याना भेटायला ..
तिने सारवा सारव केली… आत्ता काही कामच नसते रे…
काही काम असायलाच हवे का ? नुसतेच भेटायला येऊ शकत नाही का ?
त्याचा शब्द कधीच मोडला नाही.तिने पण विचार केला , काय हरकत आहे ? मागच्या चुकांबद्दल ,….कुणाबद्दल काही बोलायचे नाही.बस एकदा भेटायचे पुढे किती वर्ष ही आठवण पुरेल आपल्याला.. कधी जावे? त्याचा वाढदिवस आहे की ! ठरले … त्याला पण फ़क्त मेसेज केलेला आवडत नाही, ५ मिनिटे भेटायचे … बस..
मनाशी सर्व ठरवून ती खुश झाली. तो दिवस येण्याची वाट बघत राहिली.
फ़ोन केला …. मुंबईतच आहेस? मी येवू का आत्ता ?
तो म्हणाला … मी आत्ता घरीच आहे… अजुन काही इतर ठरवले नाही आहे … येना..
तिच्या मनात धाकधुक … त्याच्या घरी आवडेल का? पण विचारावे कसे… हळूच विचारले… पण आज …
त्याचे हसून उत्तर … मला माहित आहे – तू का येतेस ते … ये..
बायको गडबडीत होती … तरी पण तिचे हसून स्वागत केले… चहा दिला म्हणाली..मला बाहेर जायचे..ती थोड्या वेळाने निघून गेली.
काय बोलावे हे ठरवून पण आठवत नव्हते … घरचे कसे आहेत? नविन कामा बद्दल … आवडते का ?अगदी निग्रहाने तिने खुप मोकळी असल्यासारखे दाखवायचा प्रयत्न केला..त्याने आपल्यासाठी एवढा वेळ दिला , ह्याचेच तिला अप्रूप वाटत राहिले.
थोड्या वेळाने ती निघाली …..
किती सांगायचे राहिले..त्याने वेळोवेळी छोट्या छोट्या गोष्टीत नकळत घेतलेली तिची काळजी… तिला नेहमी आठवते ….त्याचे हक्क गाजवणे तिला खुप आवडत होते … म्हणून ती सर्व निमूट ऐकून घ्यायची .किती बदलला … जरा पण हक्काने काही सांगितले नाही….
कसे बसे स्वतः ला तिने रिक्षात कोंबले… डोळ्यावर गॉगल चढवला … अश्रुं ना कसे बसे थोपवले..त्याचे थंड शब्द आठवत राहिली..
Mast ahe re…pan tuzi hi imagine mhanavi ki..konachi story ahe?..anyway hot asss…I engaged to make my little story interesting.. Kudos for this story.
आभारी आहे!