तो …चांगला खडुस

दुपार नंतर ती थोडीशी मोकळी झाली कि महत्वाच्या कामांच्या सुचि वर नजर टाकत असे. ती कामे झरझर हातावेगळी झाली , कि मग पेमेंट साठी येणारे फोन , कुणाचा पगार द्यायचे राहिलेत, फोन बिले, विजेची बिले बाकि आहेत… कुठले  अधिकारी काय प्रश्न विचारतील ह्याचा अंदाज घेत होती.

hatt1एवढ्यात तो तीरा सारखा केबिन मधे शिरताना विचारता झाला,”  कोण आले आहे?” ती ने डावीकडिल कॉनफ़रन्सरुम मध्ये नजर टाकत नावे  सांगीतली.

त्यांना चेक दिला कि, मला  व्हाऊचर बघायचे आहे. तिला कळेना , हे तर रोजचे काम.. त्यात मुद्दाम काय आहे सांगण्यासारखे?

जाऊ दे ना .. हा माणूस आहेच कुचका.. कधि सरळ काही बोलायचे नाहि….

ति व्हाउचर व  चेक हातात घेऊन उभी राहिली .. प्युन  कुठे गेला?  डॅंबिस  आहे.. कामाच्या वेळी गायब व्हायचे..

आत नजर टाकत विचार केला, आपण एवढ्या पुरुषमंडंळी मध्ये कसे जावे? शिवाय हे माझे काम नाहिच आहे.
एवढ्यात तो केबिनमधून बाहेर येऊन थेट कॉनफ़रन्सरुम मध्ये शिरला.

आता काहि खरे नाहि….बाहेर आला कि सगळा राग आपल्यावर निघणार असा विचार मनात येत असताना तिच्या लक्षात आले कि आत जाताना  व्हाऊचर आणि चेक तो घेऊन गेला होता. ती  खिळल्यासारखी तिथेच उभी राहिली. हा आहे तरी कसा.. हातातून इतक्या हळुवारपणे  व्हाऊचर व चेक नेला कि जाणिव पण झाली नाहि. तो तर केबिन मध्ये होता आणि केबिन ते कॉनफ़रन्सरुमचे अंतर फ़ार तर ७-८ पाऊले. इतक्या कमी अंतराच्या वेळेत त्याने आपले मनातील विचार टिपले आणि कृतीपण केली.

म्हणजे ह्याचा राग सगळा खोटा खोटा असतो.. लहान मुलासारखा….एकदम roller coaster सारखा… तो रागावलेला सर्वांनी पाहिला. पण आत्ता मदत केली हे  कोणालाच नाहि कळले. हा खडुस पण चांगला आहे.

3 comments

  1. आता कोणी एवढे प्रेम करतात? जरा आश्चर्य वाटते? खरेच असे घडले का?

    1. अभीप्रायाबद्दल धन्यवाद समीर!!!

      प्रेम एक जाणीव आहे
      ज्या क्षणी प्रेम जाणवेल, तेव्हा नक्कीच वाटेल की प्रेम असते….

      प्रेम म्हणजे , प्रेम म्हणजे, प्रेम असते
      जुने असो वा नवे सेम असते.

Leave a Reply to admin Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *