कर्जतच्या निवासी शिबिराचे वेळा पत्रक हातात आले, पहाटे ४.३० ला निघायचे होते. माझी मैत्रीण अनुराधाच्या यजमानांनी आम्हाला रेल्वेस्थानकावर सोडल्यामुळे आम्ही अगदी वेळेवर पोहचलो होतो. पहाटेचे प्रसन्न वातावरण , सुट्टीचा मुड , ३ दिवस मनमुराद चित्रे काढण्याचा मनसूबा .. एकदम ढिंच्यॅक सुरवात झाली होती त्यामुळे सिवूडस् स्टेशन वरुन मेल एक्सप्रेसचे जाणे पण आम्ही मस्त अनुभवले.( वाशी ते पनवेल मार्गावरील सिवूडस् हे एक स्थानक आहे, आणि ह्या मार्गावर मेल एक्सप्रेस धावत नाही ) अर्थात स्थानकवर रहदारी नसल्यामुळे आमचा पोरकटपणा कुणाच्या लक्षात आला नाही.
सिवूडस् ते ठाणे व तेथून कर्जत अशी मजाल दरमजल करत आम्ही सर्व कर्जत स्थानकाबाहेर जमलो. कर्जतच्या संस्कार भारती विभागाने आमच्यासाठी खास रिक्षाची सोय केली होती , त्याची वाट पाहत उभे होतो. सेल्फ़ी फोटोज काठणे माझे इति कर्तव्य समजून कामाला लागले.
पावसकर सरांनी वर्तमान पत्र वाचणे पसंत केले, तर जाधव सरांनी मोबाईल मधील ताज्या घडामोडी वर नजर टाकण्यास सुरुवात केली. काहिंनी फोटोसाठी सराइतपणे स्मित हास्य केले.
सेल्फ़ी स्टिकची कमी शुभम मूळे जाणवली नाही आणि मग अशा धमाल क्लीकस निघाल्या.
फार्म वर पोहचल्यानंतर आमचे लक्ष वेधले भुतकाळात गेलेल्या ऊखळ , जाते, पाटा – वरवंटा ह्या वस्तुंनी. फोटोज काढण्याचा आनंद द्विगुणित झाला हे सांगणे न लगे.
शिरस्त्या प्रमाणे उद्घाटन , ध्येयगीत व मार्गदर्शन पर भाषणानांतर माननीय श्रीकांत जाधव सरांचा डेमो झाला. कर्जत रहिवासी ख्यातनाम चित्रकार पराग बोरसे तसेच अभिनेते राहुल वैद्य ह्यांची सदर कार्यक्रमास उपस्थिति होती, त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित दुपारी जेवणानंतर लगेचच आम्ही विस्तीर्ण पण आधुनिक गोठयाजवळ चित्रणासाठी गेलो.


संध्याकाळी सर्वांच्या चित्राचे सादरीकरण, चर्चा झाली. त्यावेळी जाधव सर तसेच पावसकर सरांचे मार्गदर्शन मिळाले. रात्री जेवणानंतर लगेचच पोर्ट्रेटसाठी सगळे जमले. राजेश कांबळेने गमंतीने बंकर बेड वरुन टॉप व्ह्युचा अभ्यास कर, असा सल्ला दिला. पण मी मात्र तो सल्ला गंभीर पणे घेतला.
अशा रीतीने आमचा शिबिराचा पहिला दिवस अस्सा धमाल होता. बाकीची धमाल उद्या सांगते.
Sundar vrutaankan ; abhinandan
धन्यवाद सुनीलसर!
Nice experience. I m interested in such camp. Please intimate me if possible.
नक्कीच!