शिल्पा आणि मी

शिल्पा आणि मी, हे खास नाते आहे.  शिल्पा माझी मामेबहिण , दुसरी शिल्पा माझी मैत्रीण.

एक बहिण पण खास मैत्रीण तर दुसरी मैत्रीण पण बहिणीसारखी.

शिल्पा जेव्हा आमच्याकडे एक वर्ष कॉलेजसाठी होती, तेव्हा मला कळले कि मला बोलता येते, आणि आपण फ़क्त मोठ्याचे ऐकायचे नसते तर आपले मत पण व्यक्त करायचे असते.मी मितभाषी असले तरी ,ती बोलकी आणि मनमिळाऊ असल्यामुळे तीला माझ्याशी जुळवुन घेणे कदाचीत सोपे झाले असावे. शिल्पा म्हणजे उत्सवमुर्ती, तीला सगळ्याची आवड. कॉलेजच्या गॅदरींग मध्ये भाग घेत असे, त्याचप्रमाणे अभ्यासात हुशार होती.ती अजूनही छान कविता करते. नविन खाद्यपदार्थ बनवणे हा पण तिचा जुना छंद. मला विणकाम तिनेच शिकवले.  स्पर्धांमधे भाग घेण्यास  तीनेच प्रव्रुत्त केले. आम्ही खुप छान क्षण जगलो. ती आता गोव्याला स्थायीक झाली आहे, मी मुंबईला.दोघी आपापल्या संसारात मग्न. पण जेव्हा भेटतो , तेव्हा खुशाली विचारायच्या आधी पोटभर रडतो. असे का होते माहित नाहि,कदाचित भेटल्यावर एकमेकांपासून दूर होतो हे तिव्रतेने जाणवते. काहि नातीच अशी असतात कि एकमेकांपासून दूर राहिल्याने मनाचे अंतर कमी होते. काहि अपरीहार्य नाती , जी जवळ राहून हि कायम कोरडं अंतर राखतात. निघताना पण तेच परत रडारड, जसे काहि दोघींना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली आहे.

ऑफ़िस मध्ये सिनीयरनी ओळख करुन दिली, ” हि शिल्पा ” परत एक उत्साहाचा धबधबा अंगावर कोसळला. खरे तर आमच्या वयात बरेच अंतर आहे, परंतु ते जाणवतच नाहि. मी कधी असे बोलले तर शिल्पाचे लगेच उत्तर ” गप ग, असं काहि नसतं”. शिल्पाचे घर माझ्या आईच्या घरापासुन जवळ आहे. त्यामुळे मी माहेरी गेली कि आमची भेट होतेच. किंबहुना आम्हाला भेटायचे असते म्हणुन मी माहेरी येते, असे माझी आई म्हणते.

आता परत  count down सुरु, कारण शिल्पा पुण्याला स्थायीक होईल कदाचीत.  तेव्हा लवकरात लवकर भेटण्यासाठी फोनाफोनी चालु असते, सुट्टीच्या दिवशी घरातील कामे आट्पून मॉल भटकंती, जवळचे स्पॉट असा भरगच्च प्रोग्राम असतो. आता तर डिजीटल फोटोची पण साथ आहे, नंतर आठवणी काढायला.

1 comment

Leave a Reply to Krishna Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *