पत्र …यो यो ला

प्रिय यो यो हनी सिंग,

मला तुझ्या संगीतरचना खुप आवडल्या. वेड लावणाऱ्या रॅप रचना परत परत ऐकाव्या अशा आहेत.
तु म्हणशील यात नविन ते काय? माझ्या कुठच्या पण कॉन्सर्ट ला ये! मग तुला कळेल माझी किती क्रेझ आहे ती?
honey-singh1मान्य आहे. तुझं संगीत, रॅप मंत्रमुग्ध करणारे आहे. जबरदस्त वेदना आहे. तु ’रॉकस्टार’ पहिलास का? त्यात म्हटले आहे बघ….वेदनेशिवाय कला फुलत नाहि.

पण…..
ते तुझ्या गाण्यातील शब्द तेवढे खटकतात. तुझा मुलींवर एवढा राग का?
“फिर शुरु तेरी बरबादि, धोयेगी तु कच्छे और गंदे बर्तन,देखेगी तु सास बहु और दुरदर्शन, बनके रह जायेगी तु हाउसबिविss….”

हाउसबिवि हे कमीपणाचे काम आहे का? मुलांसाठी पुर्णवेळ देणारी आई हे आजकाल किती गरजेचे आहे ह्याची तुला जाणीव आहे का? घरातील कामं करणं हे फक्त महीलांची मक्तेदारी नाही हे तुला लग्नानंतर कळेलच म्हणा.

अरे… वैतागलास का? तुझीच तक्रार तुझ्याजवळ करते ! का माहित आहे का? अरे तुझ्याजवळ  जबरदस्त फ़ॅनफ़ॉलोयिंग आहे. संगीताची किमया आहे, त्याचा वापर तु चांगल्या प्रकारे का नाही करुन घेत? बघ ना महीलांवरचे अत्याचार वाढत चालले आहेत. कधी स्त्री तंदुरी सारखी भाजली जाते, तर कधी आप्तांकडून वर्षानूवर्षे भरडली जाते. तीने नाती जपायची , पण ’मुलगी’ म्हणुन जन्मण्य़ापुर्वीच तीचा गळा घोटला जातो.

“तेरे घर अखबार नै आता!” असं तुलाच विचारु का? शहरात काय दुर्घटना घटतात ते बघ जरा, दिल्लीचे रस्ते किती भयानक रुप धारण करतात आहेत…
“यो यो हनी सिंग” म्हणजे ’आपका अपना हनी सिंग’ असे तुच म्हणतोस ना? म्हणुन तुला सांगीतले. पैसा आणि नाव तुझाजवळ आहे. मग असा राग का काढतोस गाण्यामधुन? अरे प्रेमाच्या अनेक छटा आहेत…..त्याचा अविष्कार तुझ्या संगीतातून कर ना…. तुझे फॅन तुझं एकतील, तेव्हा त्यांना स्त्री बद्दल जरा आदर वाटेल असे शब्द वापर. मोठया मोठया क्रांतीमध्ये कलेचा हातभार हा असतोच, असे इतीहास सांगतो. तेव्हा तुझी कला तु जरा चांगल्या कामासाठी वापरावी, अशी भाबडी इच्छा आहे.  घसरत जाणाऱ्या समाजाच्या नितीमुल्यांमध्ये अशी भर नको टाकू.  हे तुला सहज शक्य आहे.

Your फॅन

हे पत्र पोस्ट करण्यात काहीच अर्थ नाही. जिथे आमच्या राजकारण्यांची इच्छाशक्ती कमी पडते, तीथे हा यो यो काय करणार?

3 comments

    1. अभिप्राया बद्दल आभारी श्रीराज !
      तुमच्या पोस्टची /प्रोफाईलची लिंक जरूर द्या

Leave a Reply to Manisha Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *