आंजर्ले – एक आठवण

मस्त स्पॉट

IMG_1944मागच्या आठवड्यात संस्कार भारतीचा निवासी वर्ग  आंजर्ले येथे संपन्न झाला. प्रसन्न सकाळ म्हणजे काय हे तिथे पोहचल्यावर लगेच जाणावले. नारळ , सुपारीची झाडे , लालबुंद माती , थंड  हवा,स्वच्छ आभाळ , कौलारू घरे सगळेच काही हरखून जावे असे होते. चौसोपी वाड्यातील झोपाळा, शेणाने सारवलेली जमीन,चूल, भिंतीतील चौकोनी- त्रिकोणी , छोटी – मोठी फडताळे , जुन्या पद्धतीचे न्हाणीघर…..खूप वर्षांनी माहेरी आल्याचा आनंद झाला .

41

आंघोळीच्या पाण्यासाठी  चूल पेटवली गेली.  त्याचवेळी चहाचे आधन  ही ठेवले गेले. सगळ्यांची  ही लगबग , लवकर तयार होऊन गणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक पाहण्यासाठी होती. विवेकच्या भन्नाट कल्पनेतून साकरलेले कूपम्स वर  चर्चा करत नाश्त्याचा आनंद घेतला. त्यानंतर गणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक झाले . दुपारपर्यंत त्याच परिसरात निसर्ग चित्रण करण्यात सगळे गढले.

19

9

आज जेव्हा  गिझर चालु  केला, तेव्हा  त्या उन उन  पाण्याची आठवण आली, आणि चुलीवर तापवलेल्या पाण्याचा दरवळ झाल्याचा भास् झाला. पहिल्या दिवसाची  हि काही क्षणचित्रे  सर्व आठवणी ताजे करणारी आहेत.

गणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक
गणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक
गणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक
गणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक
मस्त स्पॉट
मस्त स्पॉट

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *