दिल्लीतील घटनेमुळे महिलांवरील अत्याचारांला वाचा फुटली. ह्या घटनेस जबाबदार असलेल्या बऱ्याच घटकांचा उहापोह झाला. टि.व्ही, सिनेमा इ. माध्यमांतून होणाऱ्या वाईट संस्काराबद्दल बरीच परखड मते मांडली गेली. पण इंटरनेट्मुळे मुलांवर होणाऱ्या संस्काराबद्दल अजुनही म्हणावी तशी जागृगता आपल्यामध्ये झालेली नाही. आपल्या अपरोक्ष मुले इंटरनेट्चा वापर कसा करतात ह्यावर पालकांचा हवा तसा वचक नसतो. बऱ्याच वेळा पालकांपेक्ष्या मुलांना तांत्रीक ज्ञान जास्त असते किंवा आम्हाला आता काय करायचे शिकून वगैरे म्हणुन पाल्याला अती प्रोत्साहन दिले जाते. हिच वेळ आहे कि पालकांनी आपल्या पाल्याला इंटरनेटबरोबर किती आणि कशी घसट करु द्यावी ह्याबद्दल योग्य निर्णय घेण्य़ाची. कॉम्पुटर मोकळ्या जागेत ठेवावा, जेणेकरुन पाल्य कुठच्या जालिय संस्थळांना भेट देतात ह्यावर नजर देवणे सोपे जाईल. सोप्या तांत्रीक बाबी शिकून , इंटरनेटचा वापर उत्तम भविष्य घडवण्यासाठी कसा करावा, ह्याबाबत पाल्याशी खेळिमेळीने संवाद साधणे व मार्गदर्शन करणे सोपे जाईल.