अमोल

snapshot-1-13-11-2012-2-44-pmअमोल खुप आखडु होता. अर्थात हा माझा भ्रम होता, हे मला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जाणवले. झाले असे, तालीमीसाठी आम्ही जमलो तेव्हा सर्व जण अजिबात serious नव्हते. मी अक्षरश: सर्वांना जबरदस्ती तुम्हाला बाल्या डान्स करायचाय, फ़क्त ९  स्टेप्स आहेत, पटकन होईल वगैरे सांगुन एक व्हिडियो दाखवला. सगळे डान्समध्ये रमले , हे पाहुन मोर्चा सरस्वती वंदन कडे वळवला. सगळ्यांना जोशभरी गाणी मिळाली, मग सरस्वती वंदन मी व वृशालीने करावे असे सर्वानुमते ठरले. सहभाग छोटा असला तरी, छान व्हावा असे वाटत होते. हातात फ़क्त तीन दिवस होते.

दुसऱ्या दिवशी सगळे जमल्यावर अमोलने मितालीची ओळख करुन दिली, हि त्याची मैत्रिण कथ्थक नर्तिका आहे. माझा ह्या वयातील उत्साह पाहुन, त्याने तिला माझ्या मदतीसाठी खास बोलावले होते. मी मितालीला आमच्या स्टेप्स दाखवल्या. तिने सुधारणा केल्या. “ज्योत्सेपरीssss”  हि मुद्रा पाहिल्यावर मिताली म्हणाली” हा भोपळा झाला!” मि करत असलेला चंद्र, पौर्णिमा सगळं एकच वाटत होतं, चारी दिशांऐवजी पुर्ण जग दर्शवले जात होते. काय होत होते माहित आहे,  डान्सचे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे,  स्वत:च्या गिरक्या स्वत:लाच खुप छान वाटत होत्या. पण असे असले तरी त्या मुद्रा ह्या शब्दाबरहुकुम होत नव्हत्या त्यामुळे ते खरे तर चांगले दिसत नव्हते.

अमोलने केलेली ही मदत त्याच्याबद्दल खुप काही सांगुन गेली. त्याला माझ्या नृत्यातील चुका कळत होत्या. ” तुम्हाला डान्स कळतो का? “किंवा तत्सम अपमानीत शब्द तो सहज बोलु शकला असता. नृत्यातील हालचाली मोहक असल्यातरी त्या उठावदार व्हाव्या म्हणुन त्याने आपल्या मैत्रिणीला बोलावले. परतुं ह्या सर्व बाबतित कुठेच गर्व दिसत नव्हता, उपकाराचे भाव नव्हते. कळत होती ती फ़क्त मदत करण्याची तळमळ.  ह्या सर्व धावपळीत तो सर्वांना cheer up करत होता  आणि स्वत:च्या performance वर पण मेहनत घेत होता. एकंदरित पुर्ण कार्यक्रमामध्ये अमोलची कामगिरी वाखागण्यासारखीच होती. धन्यवाद अमोल….  तुझ्या उज्वल भावी आयुष्यासाठी  अनेक आशिर्वाद !!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *