शालेय शिक्षण म्हणजे जीवन नाही

mataदहावी- बारावीच्या निकाल प्रक्रियेमध्ये बरेच बदल केले आहेत. असे असुनही मुलांच्या तसेच पालकांच्या मनात “भरपुर मार्क्स मिळवणे” हे आकर्षण अजुनही आहे. पण ह्यामुळे मुलांच्या मनावरील ताण वाढतो आहे. मुलांमधील वाढते आत्महत्येचे प्रमाण हे त्याचे द्योतक आहे. शाळांमधे प्रत्येक पाल्याचे त्याच्या पालकांसहीत मार्गदर्शक सत्र (काउन्स्लिंग सेशन)कागदोपत्री न ठेवता सक्तीचे करावे. जेणेकरुन पाल्य- पालकांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच मुलांना त्याच्या पुढील आयुष्यासाठी लागणारे मानसिक बळ त्यांचे पालक योग्यरीतीने देऊ शकतील. जीवन हे शिक्षण आहे, पण फ़क्त शालेय शिक्षण म्हणजे जीवन नाही. हे सत्य स्विकारुन जीवन समर्थपणे जगण्याचे बाळकडु मुलांना लहानपणापासुन मिळाले पाहिजे.

महाराष्ट्र टाईम्स १४.०८.२०१२

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *