गणेशोत्सव हा आपल्या सर्वाचा आवडता सण. गणेशोत्सव मंडळांचां उत्साह तर ह्या दहा दिवस ओसंडुन जात असतो. पुर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. जसे जसे आपल्या दैनदिन जीवनाच्या गरजा बदलल्या , तस तस्या आपल्या सामाजिक गरजा हि बदलल्या. त्याचे पडसाद आपल्या उत्सव साजरे करण्यावर सुद्धा दिसुन येउ लागले. सिनेमे दाखवणे, ऑर्केस्ट्रा, स्थानीकांचे करमणुकिचे कार्यक्रम अशी वेगवेगळी स्थित्थ्यंतरे आपण पाहिली. देखाव्यातील विविधता, मुर्तिची उंची अशा वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये चढाओढ असे.
अनेक मंडळांवर बरेचदा वेगवेगळ्या कारणांसाठी आरोप केले जातात. पण ह्यावेळी काही मंडळांनी मात्र खुपच स्तुत्य उपक्रम राबवल्याचे निदर्शनास आले आहे. काही मंडळांनी रक्तदान शिबिरे आयोजीत केली होती. बालगोपळ मित्र मंडळ – विलेपार्ले, फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशा काहि गणेशोत्सव मंडळांनी अवयव दानाची शिबिरे आयोजीत केली होती.अवयव दानाची व्याख्याने आयोजीत केली होती. आणि त्यांना लोकांनी उत्स्फुर्त दाद दिल्याचे दिसुन आले. जवळ जवळ ४०० च्या वर लोकांनी अवयव दान फ़ॉर्म भरुन त्याची कार्डॆ संपादन केली. अशा सामाजिक कार्यांचे जर इतर मंडळांनी अनुकरण केले तर लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतुने गणेशोत्सव चालु केला , ते सफ़ल होईल