घंटीवाला बातमीदार

म.टा. तील ’दखल’ ह्या विभागातील छोट्याश्या बातमीने चटकन लक्ष वेधले – ” घंटीवाल्याच्या बातम्या”

chantiwalalजवळजवळ  समजु लागल्या पासुन पेपर, रेडिओ वरील बातम्या वडिलधारी मंडळी वाचताना आणि ऐकताना पाहत आलो.  मोठे होत असताना दुरदर्शनवरील बातम्या पाहण्यातील कौतुक अनुभवले. आता तर २४ तास बातम्यांचा भडिमार अनेक वाहीन्यांवरुन सतत होत असतो, तो हि अंगवळणी पडतो आहे. मोबाइल व इंटरनेट मुळे बातमी क्षणात प्रत्येकापर्यंत पोहचत असते.

जगाच्या इतक्याजवळ पोहोचलो आहोत त्यामानाने, आपल्याला आपल्या शेजारच्या घरातील , गल्लीतल्या बातम्या जरा उशीराच कळतात. म्हणजे एखादे अति उत्साही काका किंवा काकू शेजारी नसतील तर हे जास्त जाणवु शकते.

सायन कोळीवाड्यातील हरि घंटिवाला म्हणजेच हरिचंद भर्तुराम डिक्का , हे ५८ वर्षीय गृहस्थ गुरु तेग बहाद्दुर नगर, सिंधिकॅम्प , चुनाभट्टी ह्या परीसरातील घडामोडि तेथील लोकांना पुरवत असतात. कुठे नवा सेल आहे, नवीन शाळा किंवा दवाखाना चालु होणार, एखाद्याच्या मृत्यु झाला वगैरे बातम्याचा समावेश त्याच्या  बातम्यामधे असतो.लोकांना सतर्क करणाऱ्या  तसेच लोकोपयोगी बातम्या अविरत पुरवण्याचे काम ते करत आहेत.त्याच्या वडिलांनी ४७ साली फ़ाळणीमुळे येणाऱ्या निर्वासितांच्या बातम्या देण्याचा वसा  त्यांनी पुढे चालवलेला आहे.मृत्यु व शोकसभेच्या बातमीचे रु.३०० व्यावसायीक बातमीचे ते रु.५०० घेतात. पण गुरुद्वाराच्या बातमीचे ते पैसे घेत नाहित.नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत त्यांनी आपले व्हीजीटींग कार्ड बनवले आहे व मोबाइलवरुन बातम्या स्विकारतात . एखाद्या वृत्तवाहिनीने त्याची दखल घ्यायल हवी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *