नुकतेच सोशल साईटसवर तसेच अनेक वाहिन्यांवर पवारांवर हल्ला अश्या असन्ख्य प्रतिक्रिया उमटल्या. बहुसख्यं प्रतिक्रियांचा सूर ” मराठी माणसावर हल्ला “म्हणून निषेध असाच होता. असा हा प्रश्न खरचं मराठी अस्मितेचा होता का?मराठी नेत्यानी मराठी माणसांवर अन्याय केला अशी एक पण घटना नाही आहे का? हि घटना मराठि माणसाबद्दल नव्हतीच, धर्माची तर नाहीच नाहि! हि घटना म्हणजे सामान्य माणसाचा प्रक्षोभ होता….. मराठी नेत्यानी मराठी माणसांवर अन्याय केला अशी एक पण घटना नाही आहे का?
नेत्याला थप्पड मारली त्याची दृश्यफित सतत दाखवून लोकांना भडकवले जात होते. दुसऱ्या दिवशी बंद पाळला, आंदोलने झाली. बहुतेक शाळा मुलांच्या हितासाठी बंद होत्या. अर्थात हे पाठींबा दर्शवण्यासाठी नसले तरी मुलांच्या अभ्यासाचे नुकसान झालेच.
किरपन त्याने स्व:तवर चालवली होती, पण ते द्रुश्य चुकिच्या अॅंगलने दाखवून गैरसमज वाढवण्याचे काम वृत्तवाहिन्या करत होत्या. असेच जेव्हा जैतापुर मध्ये घडते, तेव्हा ती दृश्य सतत का दाखवली जात नाहित? मुळात ती दृश्य कॅमेराबंद का होत नाहीत ? अनेक शेतकरी आत्महत्या करतात, तेव्हा त्याचा पाठपुरावा का केला जात नाही?
ह्या घटनेची ताबोडतोब FIR नोंद u/s 323( causing hurt), u/s 353( attack on a public servant) u/s 506 ( criminal intimidation) ह्या कलमाअंतर्गत करण्यात आली व हरविंदर अजुन पोलिस कस्टडित आहे. अशीच एक दूसरी घटना. पंजाबच्या एका सरपंचाने वरींदर कौर , ह्या रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षिकेला श्रीमुखात मारली. हि महिला भटिंडाच्या खासदार हरसिम्रत कौर ह्यांना , आपल्यास नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी भेटु इच्छित होती. महिलेस मारहाण करणाऱ्या बलविंदर सिंह ह्या सरपंचाविरुध्द FIR नोंद करण्यास २४ तासापेक्षा जास्त कालावधी लागला. तक्रार नोंदवली ती सुद्धा u/s 3239 causing hurt) ,u/s 342( punishment for wrongful restraint) अशा किरकोळ कलमाअंतर्गत शिवाय त्याची बेलवर सुटका झाली.
दोन्ही घटनेत सामान्य माणुस भरडला जातो. असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात धुमसत आहेत, त्याचा हा पडसाद आहे