आज गमती गमतीत एक गंमतच झाली!!!
खास मैत्रिणींच्या व्हाट्स अॅप ग्रुप वर सहजच एक कविता शेअर केली. सर्वाना आवडली आणि त्यांना ती मी केली असे वाटले !!!
श्रुति म्हणाली ” तु छान लिहितेस म्हणून मला वाटला ही तुजहि कविता आहे”
गमती गमतीत मी पण बोलले ” असे म्हणतेस ? तर करुन बघायला हवी कविता ”
आणि असेच काहीतरी कागदावर खरडले अन टाकले ग्रुप वर. ” एैका आता माझ्या कविता… काही गरज होती का मला ऊकसायची …आणि खुपशा smileys….
पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या मैत्रिणींना कविता खुप आवडली….मला वाटले माझी फिरकी घेणे चालले असावे …पण श्रुतिने ती कविता फेसबुक वर पोस्ट केली .
आत्ता पण ही इथे पोस्ट करायला नीलाक्षी व श्रुतिने सांगितले !!!!! मैत्रिणीं कित्ती वेड्यासारखे प्रेम करतात ना ? तर हि माझी माझी पहिली कविता …सांगा कशी वाटली !!!
असे का व्हावे ?
त्याच्या आठवणीने मन हळवे का व्हावे ?
आसमंतात आठवणी ठेवुन त्याने तरी असे का जावे ?
त्याच्या रुक्ष बोलण्यांत हि प्रेम का दिसावे ?
त्याच्या नसण्यात हि त्याचे असणे का भासावे ?
त्याच्या रागातहि आपलेपणा का जाणवावा ?
खुळी आशा दाखवून त्याने तरी असे का जावे ?
मला वाटते तेच त्याला वाटावे अशी हुरहुर का व्हावी ?
मन आहे ,
आठवणी तर दाटून येणारच ना ?
हि अशी उलथापालथ तर होणारच ना ?
होते असे …..
ताज़ी ताज़ी कवयित्री