१२ ऑगस्ट च्या म.टा. मधील ” मरने से पहले जिना सिख ले” ह्या लेखात मित्र उपक्रमाची माहिती वाचली. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने मित्र म्हणजेच माईंड इन ट्रेनिंग फ़ॉर राइट अवरनेस हा उपक्रम ५ ऑक्टोबर २०११ पासुन सुरु केला आहे. शासकिय शाळा ,अनुदानित शाळा, निवासि शाळा, आश्रमशाळा तसेच बी.एड व डि.एड कॉलेजेस येथे राबवण्यात येणारा हा उपक्रम म्हणजे मनाचे शिक्षण देण्यासाठि शासनाने उचललेले अचुक पाऊल म्हणावे लागेल.असे उपक्रम यशस्वी व्हावे असे मनापासुन वाटते. अशा अनेक स्तुत्य उपक्रमांची शासनाकडून अपेक्षा आहे.
अप्रसिध्द पत्र