आज Mothers डे – म्हणजे आपला मातृदिन . कदाचित पश्चिमेची संस्कृति म्हणून आपण साजरा करायची पद्धत नाही. पण आईला प्रेमाने नमस्कार करायला कुठलीही संस्कृति आड़ येऊ नए.खरतर आईच्या प्रेमाला क़िवा प्रेमालाच व्यक्त होण्यासाठी वयाचे, धर्माचे आणि वेळेचे बंधन नसावे. माज्या आईने मला नेहेमी नविन काही करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आज मी तिचीच कविता लिहून माज्या ब्लॉगचा श्री गणेशा करते.
…. माझ्या आईने लिहिलेली कविता ……
असाच एका सांजच्या पाराक बसलय थकान भागान,
ड़ोळो लागलो गाव दिसलो ,झालय मी न्हान
एका अंगाक लांब कशी दिसता सुन्दरवाड़ी
दुसरया अंगाक आसा बाये तेरेखोलची खाड़ी
दाया हाताक शिरोडा, उजव्या हाताक साताराडा
मधि बाये सुबकसा दिसता माजा आरोंदा
चारय बाजुक हिरवी झाड़ी तलकोकण दिसता
डोंगर आणि खड़पातून पाणी व्हावता कसा
सातेरीच्या देवळत चौघडो वाजता
भद्रकालिच्या देवळात बाबलो शिंग फुंगता
अत्ताराचो फायो लावन आबा देवळात येता
देवळात बसांन दादा माजो गारहाणा घालता
सकाळच्या पारक चाय टोस्ट आता
थयसरच्या पेजेची याद माका येता
हयसर मेळता कोबी आणि टोमैटो फ्लावर
फणसाच्या भाजयेची त्याका नाय सर
पापलेट आणि हलवो कालचो मेळता हय
सुक्या बांगडयाची चव आसा खय
आंबोलिच्या घाटावरती पांधुरक्या धुक्या दिसला, म्हणजे कसा मन गहिवरून जाता
अश्या माझ्या गावाची सर खेका नाय
माका बाये जावक केवा मेळताला काय ?
मातृदिनाच्या सर्वाना शुभेछ्या !!!!!!