बाबा कुठे गेले ?

baba1आईची कवितालिहून झाल्यावर सहजच फेसबुक उघडले. माझ्या मुलाचा मित्र ऑनलाइन होता – अमेय . हा प्रथम मुंबईत होता रहायला , ५ वर्षा पूर्वी पुण्याला स्थायिक झाले. त्याला मित्र म्हणून फेसबुक वर मी मुलाला खुप सूचना दिल्या . तोच अमेय आहे का? त्याला पूर्वीच्या शाळेचे विचार, त्याचा इथला पत्ता विचार वैगेरे . पूर्ण खात्री झाल्या वर मी परवानगी दिली होती.

आता तर मी पण त्याची फेसबुक मित्र होते. मला पण त्याच्याशी बोलायाचे होते , कारण त्याची आई माझी मैत्रीण होती. ती आता या जगात नाही, तिच्याबद्दल नंतर सांगेन केव्हातरी . पण मैत्रीण म्हणून खुपच आठवणी ठेवून गेली.

त्याला ऑनलाइन पाहिल्यावर पहिला प्रश्न केला ,”मुंबई ला येणार आहेस का ?” कारण त्याला घरी बोलावले असते २-३ दिवस , माझ्या मुलाला पण आनंद झाला असता .
“नाही”
“माझे बाबा मला सोडून गेले आज ”
“तू पुण्याला नाहीस ? बाबा त्ता कुठे सोडून गेले तुला ?”
“माझे बाबा जग सोडून गेले ”
!
!

!
!
मी एकदम सुन्न होउन गेले. प्रथम मला खरेच वाटेना. आज गेले ह्याचे बाबा तर ,हा नेट वर ? त्याला कही प्रश्न विचारल्यावर खात्रीटली. पण मनात बरेच प्रश्न आले .

मुले आजकाल ऐवढी भावनाशुन्य होताहेत का ? ठीक आहे , बाबा गेले मी आता माझ्या कामाला लागतो .
त्याला प्रसंगाचे गां
भीर्य कळत नव्हते ? की त्याच्या घरात त्याला गांभीर्य जाणवू दिले नव्हते ?
अस तर नाही की मुले वयापेक्षा लवकर मोठी होताहेत ?
तरी पण एक दिवस त्याला आठवण होवू नए त्याला बाबांनी दिलेल्या एखाद्या गोष्टीची , नाहीतर त्याच्या बरोबर पिकनिकला गेला होता त्याची क़िवा त्यांच्या नसण्याची?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *