नवी मुंबई हे सुनियोजित शहर मानले जाते. त्यामुळे इथे बेकायदेशीर बांधकाम नसावे अशी माफक अपेक्षा ! परंतु नेरुळ, तुर्भे, पनवेल इ. ठिकाणी रेल्वे स्थानकाजवळ तसेच उड्डाणपुलाखाली बरेच बेकायदेशीर बांधकाम नजरेस पडते. थोड्या दिवसांनी हेच बांधकाम कायदेशीर करण्याचा अट्टहास धरला जाईल. तरी ह्या बाबतीत आत्ताच कडक कारवाई होणे जरुरी आहे.
तसेच नवी मुंबई मध्ये बाग, दुकाने इ. साठी आरक्षीत जागेवर तेच बांधकाम होणे अपेक्षीत असते. तरीसुद्धा अशा आरक्षीत जागेवर आणि फुटपाथवर फेरीवाले बिनधास्त व्ययसाय करताना दिसतात. अतीक्रमण विभागाद्वारे अनेक वेळा कारवाई केली जाते, परंतु ह्या सर्वांचा काहिच दृश्य परीणाम दिसत नाही. महानगर पालीका याबाबत काय ठोस कारवाई करेल?